adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मानसिक स्वास्थ्य काळाची गरज प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे

  मानसिक स्वास्थ्य काळाची गरज प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे   आजच्या आधुनिक जगात डिजिटलच्या दुनियेत जीवन जगत असतांना आपण शारीरिक आरोग्याकडे जा...

 मानसिक स्वास्थ्य काळाची गरज प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे  


आजच्या आधुनिक जगात डिजिटलच्या दुनियेत जीवन जगत असतांना आपण शारीरिक आरोग्याकडे जास्त लक्ष देतो आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचा परिणाम शरीरावर होतांना दिसून येतो. Sound mind in Sound Body या उक्तीप्रमाणे शरीर आणि मन यांचा जवळचा संबंध आहे. भारतात मानसशास्त्राबद्दल अनेक समज गैरसमज दिसून येतात. मित्रहो आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य म्हणजे काय? हे समजून घेणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मते "आपण शारीरिक आरोग्यापुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता सतत चालू ठेवले पाहिजे म्हणजे मानसिक आरोग्य होय." व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन आणि ताण हाताळण्याची क्षमता संतुलित ठेवणे यात आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, सकारात्मकता आणि इतरांशी सुसंवाद ठेवण्याची क्षमता म्हणजे मानसिक आरोग्य होय.

मानसिक आरोग्य आजच्या आधुनिक जगात का आवश्यक आहे:

1) सकारात्मक विचारसरणी विकसित होते, मानसिक आरोग्य चांगले असल्यास व्यक्ती समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो.

2) निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो. मन स्थिर राहिल्यास योग्य निर्णय घेता येतो.

3) मानसिक संतुलन असल्यास कुटुंब, मित्र आणि समाजाशी चांगले संबंध टिकतात.

4) आपल्या शारीरिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. मानसिक तणाव कमी झाल्यास शरीर निरोगी राहते.

सध्याची स्थिती:- जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) जगातील सुमारे 8 पैकी 1 व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने त्रस्त आहे. भारतामध्ये सुमारे 15% लोकसंख्या मानसिक आरोग्याच्या समस्थांना सामोरे जात आहे. महाराष्ट्रात देखील हे प्रमाण चिंताजनक आहे.

नॅशनल मेंटल हेल्थ सर्वेनुसार (NHMS):

1) सर्व प्रकारच्या मानसिक आजारांची कॉमन मेंटल डिसआर्डर 5.1% आहे.

2) आयुष्यभरातील (Lifetime) सर्व मानसिक आजारांची प्रचलितता विविध राज्यांमध्ये 8.15% ने 19.9% आहे.

3) सर्व मानसिक आजारांचा राष्ट्रीय सरासरी दर म्हणजे साधारण 14.3% लोकसंख्ये इतका आहे.

4) गंभीर मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर आयुष्यभरातील प्रमाण 1.9% आणि सध्या प्रमाण 0.8% इतका आहे.

5) आत्महत्येची जोखीम असलेल्या लोकसंख्येच्या भागापैकीची संख्या सुमारे 1% आहे.

6) नैराश्य विकारांची प्रचलितता साधारण 3.3% इतकी आहे. चिंता विकाराची प्रचलितता देखील 3.3% इतकी आहे.

उपाय आणि पुढाकार :

1) शाळा व महाविद्यालयांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करणे,

2) योग, ध्यान आणि तणाव व्यवस्थापन प्रशिक्षण देणे.

3) मानसिक आरोग्याविषयी जनजागृती मोहिम राबविणे,

4) मानसिक आरोग्याविषयी कलंक कमी करणे व खुलेपणे चर्चा करणे,


निष्कर्ष :

मानसिक आरोग्य हे फॅशन नाही, आवश्यकता आहे. प्रत्येकाने स्वतःकडे आणि इतरांकडे संवेदनशीलतेने पाहणे, मदत करणे आणि गरज भासल्यास तज्ञांचा सल्ला घेणे हे आजच्या काळाचे खरे शहाणपण आहे.

लेखक:

प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे

जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर

मो. 8329665409

No comments