अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त म्हसावद थेपडे विद्यालयात भरले ग्रंथ प्रदर्शन जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमकांत गाय...
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त म्हसावद थेपडे विद्यालयात भरले ग्रंथ प्रदर्शन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे या दृष्टीकोनातून अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वा. सै. पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद ता. जि. जळगाव येथे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पी डी चौधरी सर हे होते. प्रथमतः सरस्वती मातेचे व विविध ग्रंथांचे पूजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री व्हि आर मोरे यांनी केले. तसेच ज्युनियर कॉलेजचे शिक्षक निलेश पवार यांनी ग्रंथ वाचनाचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य श्री पी डी चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचण्याचा मौलिक सल्ला देऊन आपल्या जीवनाला संस्कारक्षम करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात घरून ग्रंथ आणलेले होते .या ग्रंथाचे प्रदर्शन विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी पाहिले . या ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी श्री एस जे पवार सर ,श्री व्ही आर मोरे सर, श्री पी पी मगरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले . त्यांना विद्यालयाचे ग्रंथपाल पवन मोरे सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री आर पाटील सर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के पी पाटील तसेच श्री ए आर पाटील , श्री डी एम सोनवणे , श्री पी.ए. महाजन व सर्व मराठी विषय शिक्षक उपस्थित होते.

No comments