गांधी प्रतिष्ठान चिपळूण आयोजित जिल्हास्तरीय इंग्रजी निबंध स्पर्धेत खदीजा व खातुन इंग्लिश मिडीयम स्कूलचे यश चिपळूण (योगेश पेढांबकर):- (स...
गांधी प्रतिष्ठान चिपळूण आयोजित जिल्हास्तरीय इंग्रजी निबंध स्पर्धेत खदीजा व खातुन इंग्लिश मिडीयम स्कूलचे यश
चिपळूण (योगेश पेढांबकर):-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल इयत्ता ६ वी मधील विद्यालयातील कुमारी झरीन फैसल खान या विद्यार्थिनीने इंग्रजी निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
गांधी प्रतिष्ठान ,चिपळूण आयोजित सदर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा ही मराठी व इंग्रजी माध्यमातून घेण्यात आली होती.त्या स्पर्धेला विविध जिल्ह्यातील शाळांचा सहभाग नोंदवला गेला होता. या स्पर्धेदरम्यान 2 ऑक्टोबर गांधी जयंती तसेच गांधी प्रेमी व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी महात्माजींना विनम्र अभिवादन म्हणून सदरची स्पर्धा घेण्याच्या आयोजन गांधी प्रतिष्ठान,चिपळूण मार्फत केले होते. या स्पर्धेला प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालय गट असे गट तयार करण्यात आले होते.
सदर निबंध स्पर्धेसाठी प्रेरणास्थान व स्पर्धा मार्गदर्शक म्हणून गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब, तसेच मार्गदर्शक शिक्षिका आफिया बिजले ,विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षक श्री.योगेश पेढांबकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री.डॉ.इसहाक खतीब,व्हा. चेअरमन श्री.जफर कटमाले, संस्थेचे सेक्रेटरी श्री.मुजाहिद मेयर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरुसा खतीब, सल्लागार सौ.नादिया खतीब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.इरफान शेख व व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विशेष अभिनंदन केले आहे.

No comments