तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कुल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड...
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कुल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कुऱ्हा येथील शिवाजी हायस्कूल येथे संपन्न झालेल्या वयोगट १७ व १४ आतील तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम च्या विद्यार्थ्यांनी संपादन केले घवघवीत यश. शाळेतील इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थिंनी कु. अंकिता सतीश सावळे व कु. ममता सतीश सावळे राहणार वढवे या दोघे बहिणींनी मैदानी स्पर्धेतील वयोगट १७ आतील भालाफेक जावेलियन थ्रो या खेळ प्रकारात उज्वल अशी कामगिरी केलेली आहे.
कु. अंकिता सतीश सावळे हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर कु. ममता सतीश सावळे ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे तसेच गोळा फेक शॉट पुट स्पर्धेत शाळेतील इयत्ता दहावीत शिकत असलेला विद्यार्थी कांचन पुंजाजी नेमाडे याने सुद्धा या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त करून शाळेच्या सरपेचात मानाचा तुरा रोगलेला आहे अशा या तिघही विद्यार्थ्यांचे व त्यांचे प्रमुख मार्गदर्शक शालेय क्रीडा समन्वयक पुनम बोदडे मॅडम यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेश महादू खाचणे , शाळेच्या सचिव मा. श्रीमती रक्षाताई खडसे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री भारत सरकार व सर्व संचालक मंडळ तथा शाळेचे मुख्याध्यापक व्ही.के.वडस्कर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आलेले आहे तथा जिल्हास्तरीय निवड झाल्यामुळे त्यांना पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे.


No comments