गौतमी पाटलीवर कारवाई करता येणार नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोन नंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण... शितल मुंढे (पुणे शहर ) प्र...
गौतमी पाटलीवर कारवाई करता येणार नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोन नंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण...
शितल मुंढे (पुणे शहर ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आपल्या कलेतून महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरांतील सबसे कातील नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या गाडीने पुणेतील वडगांव बुद्रुक परिसरांत एका रिक्षाला कारने धडके रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांनी थेट कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवुन कारवाईची मागणी केली होती. विशेष म्हणजे ज्या कारणे रिक्षाला धडक दिली ती कार नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या नावावर असल्याने पोलिसांनी गौतमी पाटील ला अपघात प्रकरणी नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. समाजी विठ्ठल मरगळे असे जखमी रिक्षाचालकांचे नाव आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कडक कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत. मात्र पोलीस उपायुक्तांनी म्हटले आहे की गौतमी पाटीलवर कुठल्याही कारवाई करता येणार नाही, त्यासाठी त्यांनी कायदेशीर बाजूही सांगितले आहे गौतमी पाटील हिच्या नावाने झालेल्या अपघात प्रकरणात रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोपही पुणे पोलिसांनी फेटाळले आहेत. अपघातावेळी गौतमी पाटील या गाडीत होती की नाही याचा तपास सुरू आहे. पण चालकांवर कारवाई केली आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. गौतमी पाटील हिने गाडीची संपूर्ण कागदपत्रं पोलिसांकडे सादर केली आहेत तसेच गरज भासल्यास गौतमी पाटीलला चौकशीसाठी बोलावले जाईल मात्र गौतमीला सध्या तरी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही.

No comments