adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे एस. जावळे विद्यालय, कुसुंबा, तालुका रावेर येथे स्नेह मेळावा संपन्न

 जे एस. जावळे विद्यालय, कुसुंबा, तालुका रावेर येथे स्नेह मेळावा संपन्न   जळगाव प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कुसुंबा खुर्द, ता. रा...

 जे एस. जावळे विद्यालय, कुसुंबा, तालुका रावेर येथे स्नेह मेळावा संपन्न  


जळगाव प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कुसुंबा खुर्द, ता. रावेर येथील सातपुडा आदिवासी शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ द्वारे संचलित जे एस. जावळे या विद्यालयातील 2003 च्या दहावी उत्तीर्ण बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम दि. 25-10-2025 रोजी, शनिवारी 12:00 वाजता अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला.

या बॅचचे विद्यार्थी यांनी आपल्या 5 वी ते 10 वी पर्यंतच्या शैक्षणिक कार्यकाळातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित केला होता. सदर बॅचमध्ये 44 विद्यार्थी होते, पैकी चार जणांनी भाषणातून, तर काहींनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक हजर होते, तसेच मराठी शाळेतील पेंशनर मुख्याध्यापक श्री दिलीप पाटील हजर होते. संस्थेचे सचिव श्री नारायण घोडके, सदस्य- बुरहान तडवी, जितेंद्र पाटील, अतुल महाजन इत्यादी उपस्थित होते, तसेच 30 ते 35 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भूषण घोडके यांनी केले व आभार प्रदर्शन विवेक महाजन यांनी केले. सदर बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.अध्यक्षीय मनोगत श्री मुबारक, उर्फ तडवी यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, नंतर भोजनाचा आस्वाद घेऊन, कार्यक्रम संपन्न झाला.

No comments