adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

" चोपडा व यावल तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करून केळी लुट थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शेतकरी कृती समिती चे साकडे....

 " चोपडा व यावल तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करून केळी लुट थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शेतकरी कृती ...

 " चोपडा व यावल तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करून केळी लुट थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शेतकरी कृती समिती चे साकडे....  


विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

चोपडा  व यावल तालुका दुष्काळग्रस्तांच्या यादीत घेऊन नंतर वगळण्यात आला.त्या संदर्भात शेतकऱ्यांनी दोन रास्ता रोको आंदोलन देखील केले त्या संदर्भात आज शेतकरी कृती समितीच्या प्रतिनिधींनी नवीन जिल्हाधिकारी श्री रोहनजी घुगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.त्यात तालुक्यातील आत्तापर्यंतच्या पावसाची व अतिवृष्टी होऊन देखील सकाळी ८:००वाजता पाऊस मोजला व त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोजला त्यामुळे  तांत्रिक बाबींनी शेतकऱ्यांचा घात झाला ही बाब देखील निदर्शनास आणून दिली.त्यानंतर चोपडा तालुक्यातील माती ही रायचिकन (Heavy black cotton soil)असल्याने निचरा न झाल्याने सततच्या पावसाने पीक मेली व कापसाची बोंड काळी पडून सरकी सडली हे समजावून सांगितलं.

 त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या यादीत तालुक्याचा समावेश करणे बाबत विनंती केली.

   यावेळी केळी चे पडलेले भाव व त्यामागील कारणे याची देखील सर्विस्तर चर्चा झाली व जिल्हाधिकाऱ्यांनी केळी उत्पादक शेतकरी,व्यापारी व बाजार समितीच्या प्रतिनिधीची बैठक घेणे गरजेचे असल्याचे लक्षात आणून दिले.

  जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी जळगाव चे आमदार मा राजुमामा भोळे हे देखील उपस्थित होते.यावेळी एस बी पाटील,प्रशांत पाटील,अजित पाटील उपस्थित होते.

No comments