रन फॉर युनिटीद्वारे एकतेचा संदेश सरदार वल्लभ भाई पटेल जयंती निमित्त अडावद येथे "रन फॉर युनिटीचे "आयोजन खलील आर तडवी बिडगाव (संप...
रन फॉर युनिटीद्वारे एकतेचा संदेश सरदार वल्लभ भाई पटेल जयंती निमित्त अडावद येथे "रन फॉर युनिटीचे "आयोजन
खलील आर तडवी बिडगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारताचे लोह पुरुष आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१/११/२०२५ उद्या सकाळी ७:०० वाजता अडावद येथे "रन फॉर युनिटी"एकात्मतेच्या धाव कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे समाजात एकात्मतेच्या संदेश राष्ट्रीय एकात्मता बंधुता आणि राष्ट्र प्रेमाचा संदेश देण्याच्या उद्देश आहे हा कार्यक्रम अडावद पोलीस स्टेशन येथून सुरू होणार असून अडावद पोलीस स्टेशन हद्दीतून परिसरातील नागरिक, विद्यार्थी युवक -युवती महिला मंडळे तसेच सामाजिक संस्था यांनी धाव या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ
यांनी केले आहे या एकात्मतेच्या धाव उपक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा पोलीस दल व अडावद पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ आणि त्यांच्या स्टॉप कडून नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, या उपक्रमातून "एक भारत -श्रेष्ठ भारत"या घोषवाक्याला
प्रत्यक्षात उतरवण्याच्या प्रयत्न होणार असून नागरिकांच्या सहभागातून देशातील एकता आणि बंधूतेचा संदेश प्रभावीपणे पोचणार आहे

No comments