ताई इथून तुम्हांला बस मिळणार नाही, लिफ्ट दिली अन् आरोपींने महिलेवर केला बलात्कार... भिगवण पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!! (पुणे जिल्हा) प्रत...
ताई इथून तुम्हांला बस मिळणार नाही, लिफ्ट दिली अन् आरोपींने महिलेवर केला बलात्कार... भिगवण पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!
(पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भिगवण पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेस अज्ञात आरोपीने ताई तुम्हांला इथून बस मिळणार नाही असे म्हणत महिलेला आपल्या दुचाकीवर बसवून तिला निर्जनस्थळी नेवुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर भिगवण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जाकया कोंडक्या चव्हाण (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून १० ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारांस पीडित महिला बसची वाट पाहत होती. यावेळी आरोपी तिथे आल्यानंतर ताई तुम्हांला इथून बस मिळणार नाही असे सांगून विश्वास संपादक करीत पीडित महिलेला मळद (ता. दौंड) गावच्या हद्दीमध्ये रेल्वे ब्रिज जवळील झाडाझुडपात निर्जनस्थळी नेवुन तिला दमकावत तिच्यावर बलात्कार केला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिगवण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत अखेर आरोपी पर्यंत भिगवण पोलीस पोचले आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपींने गुन्ह्याची कबुली दिली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू धडस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार भिगवण पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील महेश उगले सचिन पवार संतोष मखरे दौंडचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम सुभाष राऊत नितीन बोराटे अमीर शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड करीत आहेत.

No comments