adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद येथे आमदारांच्या हस्ते कुंभार वाडा फलकाचे अनावरण

  अडावद येथे आमदारांच्या हस्ते कुंभार वाडा फलकाचे अनावरण   चोपडा (संजीव शिरसाठ ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद ता.चोपडा, येथील दुर्गा द...

 अडावद येथे आमदारांच्या हस्ते कुंभार वाडा फलकाचे अनावरण  


चोपडा (संजीव शिरसाठ )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद ता.चोपडा, येथील दुर्गा देवी चौकाजवळ कुंभार वाड्यात आमदार यांचे हस्ते कुंभार युवा सेना व कुंभार वाडा या दोन फलकांचे अनावरण करण्यात आले.

     १९ रोजी सकाळी ११ वाजता दुर्गादेवी चौकातील कुंभार वाड्यात कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश संचालित कुंभार युवा सेना व कुंभार वाडा या दोन फलकांचे अनावरण समारंभ आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, विभागीय अध्यक्ष घनश्याम हरणकर, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सूर्यभान पाटील उपस्थित होते.

      यावेळी उद्घाटक म्हणून आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना प्रतिपादन केले की, कुंभार समाज अतिशय कष्टकरी, मेहनती आणि प्रामाणिक जीवन जगणारा आहे. त्यांनी आपल्या कामासोबत आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. संतांची शिकवण लक्षात ठेवून व्यसनांपासून दूर ठेवावे. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी युवकांना केले.

      जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी समाजाची दशा आणि दिशा आपल्या प्रास्ताविकात मांडली. मयुरी अनिल कुंभार या नऊ वर्षाच्या चिमुकलीने संत गोरा कुंभार यांच्याविषयी सुंदर व परखड शब्दांत विचार व्यक्त केले.

   यावेळी  सखाराम मोरे, सुभाष पंडित, सुकलाल कुंभार, किशोर कुंभार, विलास कुंभार, संजय न्हावकर , रवींद्र प्रजापति, रवींद्र मोरे, नंदिनी वाघ, महिला जिल्हाध्यक्षा सपना सपकाळे, अशोक पंडित, विनोद पंडित, संतोष कापडे , नामदेव पाटील, एम.के.शेटे ,  ग्रामपंचायत सदस्या भारतीताई सचिन महाजन, विजिता हरिश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप महाजन, रियाजअली सैय्यद, विकासो संचालक रमेशचंद्र काबरे, सचिन महाजन, प्रकाश महाजन, पीक संरक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र पाटील, पी आर . माळी सर ,मं , . बी . के.साळुंखे, साजिदखा पठाण ,मंगल कोळी ,आदींची उपस्थिती होती.

    या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुंभार समाज युवासेना अध्यक्ष भगवान कुंभार, उपाध्यक्ष अनिल कुंभार,  चेतन कुंभार, सचिव जगदीश कुंभार, सहसचिव किशोर, कुंभार खजिनदार, पंकज कुंभार, सल्लागार संजय कुंभार, प्रकाश कुंभार, युवराज कुंभार, सुरेश कुंभार, सुभाष कुंभार, प्रकाश कुंभार, पंढरीनाथ कुंभार, एकनाथ कुंभार, अशोक कुंभार, रवींद्र कुंभार, हिलाल कुंभार, लक्ष्मण कुंभार, मनीलाल कुंभार, संदीप कुंभार यांनी परिश्रम घेतले. 

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, सूत्रसंचालन सखाराम मोरे तर आभार पि. आर. माळी यांनी व्यक्त केले.

No comments