पिंप्रीनांदू गावाचा अभिमान – जिद्दी पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी तालुका अध्यक्ष इरफान शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ...
पिंप्रीनांदू गावाचा अभिमान – जिद्दी पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी तालुका अध्यक्ष इरफान शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीनांदू गावचे सुपुत्र, जिद्दी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी तालुका अध्यक्ष इरफान शहा यांचा वाढदिवस आनंद व उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामस्थ, मित्रपरिवार व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात इरफान शहा यांनी दिलेलं योगदान उल्लेखनीय असून ते युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघातील जनता तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांकडून इरफान शहा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.समाजकार्यासोबतच रॉयल कन्स्ट्रक्शन या माध्यमातूनही ते कार्यरत असून, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत.

No comments