रणरागिणी शस्त्रपुजनास उत्स्फूर्त प्रतिसाद ! योगा नृत्य आणि शौर्य प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष ! आमदार सुरेश भोळे यांना लव्ह जिहाद विरोधी काय...
रणरागिणी शस्त्रपुजनास उत्स्फूर्त प्रतिसाद !
योगा नृत्य आणि शौर्य प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष !
आमदार सुरेश भोळे यांना लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याविषयी निवेदन सादर !
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याला शाळकरी मुलीही अपवाद राहिलेल्या नाहीत या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, हिंदु जनजागृती समिती आणि गोदावरी फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे रणरागिणी शस्त्र पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
![]() |
शस्त्रपूजन करतांना रणरागिणी |
शहरातील विविध भागातील, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेकडो रणरागिणी या वेळी उपस्थित होत्या. खासदार स्मिता वाघ, माजी महापौर सीमा भोळे, भाजपच्या अधिवक्ता शुचिता हाडा, दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे, रेखा वर्मा तसेच राधा कोल्हे, डॉ.अर्पण भट, मनिषा पाटिल, नेहा जोशी आदींनी उपस्थिती दर्शवली. शहरातील कामिनी धांडे, सरिता खाचणे, डॉ. दीपिका मनीष चौधरी, विधिज्ञ अनुराधा वाणी, पद्मजा अत्रे, साधना दामले, डॉ. रेखा महाजन, मंगला बारी आदी रणरागिनींनी शस्त्र पूजन केले. सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
![]() |
| उपस्थितांना संबोधित करतांना आमदार सुरेश (राजू मामा) भोळे |
या कार्यक्रमाचा मूळ उद्देश महिलांना हिम्मत देऊन त्यांना स्व-संरक्षणासाठी प्रेरित करणे, त्या दुर्गेचे रूप आहेत आणि देवीच्या हातात दांडिया नसून शस्त्र आहे याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी समितीच्या सुप्रीम कॉलनी, कुसुंबा येथील निकिता सोनार, कोमल सोनार, वीणा जाधव, कावेरी पवणे, कोमल बंजारा, प्रगती लोखंडे, नेहा पवार तसेच खुशी वाणी यांनी दंडसाखळी, लाठीकाठी, यासारखे स्व-संरक्षण करणारे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच ज्ञानयोग केंद्राच्या हेतल पिपरिया आणि त्यांच्या सहकारी रणरागिणी यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे योगा नृत्य सादर करून देवीला मानवंदना दिली.
या वेळी कार्यक्रमाला आलेले जळगावचे आमदार सुरेश भोळे यांना रणरागिणी यांनी लव्ह जिहाद विरोधी कायद्याचे मागणी करणारे निवेदन दिले, तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा पारित करावा, अशी मागणी सर्वांनी या वेळी आमदारांकडे केली. यावर नक्की हिवाळी अधिवेशनात हा कायदा करण्याविषयी मुख्यमंत्री यांना सांगेन असा शब्द आमदार भोळे यांनी सर्व रणरागिणी यांना दिला.
![]() |
| शौर्य प्रात्यक्षिक सादर करतांना रणरागिणी |
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या कु. कृतिका कुलकर्णी यांनी केले तर कु. गौरी कुलकर्णी यांनी श्लोकाद्वारे देवीला वंदना केली. सनातन संस्थेच्या सौ. सुवर्णा साळुंखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काही रणरागिणी यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. रणरागिणी शाखेच्या कु. सायली पाटील, धनश्री दहिवदकर, निकिता सोनार, कोमल सोनार या रणरागिनींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे समन्वयक सूरज दायमा, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, सुजय चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे गजानन तांबट, निरंजन चौधरी, माधव सावलानी इत्यादींचे सहकार्य लाभले, तसेच महामंडळाचे सचिन नारळे, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ केतकी पाटील आणि समितीचे प्रशांत जुवेकर यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.
आपला नम्र,
प्रशांत हेमंत जुवेकर
हिंदु जनजागृती समिती
संपर्क : 9552426439





No comments