adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

न्यूनतम पेन्शन लवकरच वाढवली जाईल - श्रममंत्री मनसुख मांडविया

  न्यूनतम पेन्शन लवकरच वाढवली  जाईल - श्रममंत्री मनसुख मांडविया   श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नवी दिल्ली - ईपीएस -९...

 न्यूनतम पेन्शन लवकरच वाढवली जाईल - श्रममंत्री मनसुख मांडविया 



श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नवी दिल्ली - ईपीएस -९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने नुकतीच केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. या वेळी श्रममंत्र्यांनी आश्वासन दिले की, निवृत्त कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन लवकरच वाढवली जाईल.

५८ ते ७० वयोगटातील पेन्शनधारकांना ‘आयुष्मान योजना’शी जोडून मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.


समिती गेल्या आठ वर्षांपासून किमान पेन्शन ₹ ७,५००, महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधांच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन करत आहे. 

१३ ऑक्टोबर रोजी ईपीएफओ कार्यालयांवर धरणे आंदोलन केल्यानंतर श्रममंत्र्यांनी समितीला चर्चेसाठी बोलावले.


या प्रतिनिधी मंडळात राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंह राजावत, राष्ट्रीय प्रमुख संयोजक रमाकांत नरगुंड, राष्ट्रीय सचिव राजीव भटनागर आणि उत्तर भारत प्रमुख संयोजक सुरेश डंगवाल आदि सहभागी उपस्थित होते.


वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगांव 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments