कै: रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी (उर्फ तात्या) यांना जड अंतःकरणाने समाधीस्थळावर पुष्पांजली..!! (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. (संपादक -:- हे...
कै: रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी (उर्फ तात्या) यांना जड अंतःकरणाने समाधीस्थळावर पुष्पांजली..!!
(सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे सुपुत्र कै: रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ (तात्या ) यांना प्रथम पुण्यस्मरण निमिंत्त पुरी गोसावी कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक पै.पाहुणे अतेष्ठ मित्रपरिवार यांच्या उपस्थित मंगळवारी दुपारी बारा वाजता जड अंतःकरणाने समाधीस्थळावर पुष्पांजली वाहण्यात आली. सर्वांशी प्रेमळ आणि मनमिळावू म्हणून तात्यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या आठवणी या अगदी कुटुंबातच नव्हे, तर मित्र परिवारांत देखील कायमच चर्चेत राहिल्या.
जागरण गोंधळ अशा धार्मिक कार्यक्रमामुळे तात्यांचा दांडगा जनसंपर्क प्रथम पुण्यस्मरण दिवशी दिसून आला. पुरी गोसावी कुटुंबात तात्यांना प्रमुख आणि आधारस्तंभ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे आजही पुरीगोसावी कुटुंब हा कायमचा पोरका झाला आहे. मंगळवारी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमिंत्ताने पत्नी रेखा पुरी गोसावी मुलगा आकाश पुरीगोसावी योगेश पुरीगोसावी महेश पुरीगोसावी मुलगी सौ. सारिका गिरी आणि पुरीगोसावी कुटुंबाने प्रथमता तात्यांच्या समाधी स्थळाचे अंतदर्शन घेवुन जड अंतःकरणाने पुष्पांजली वाहिली त्यानंतर उपस्थित पै.पाहुणे मित्रपरिवार आत्येष्ठ नातेवाईक करंजखोप,करंजे या परिसरांतील उपस्थितांनी समाधी स्थळाचे अंतदर्शन घेत पुष्पांजली वाहत पुरीगोसावी कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झाले
No comments