adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोनई हादरली जातीय गुन्ह्याने.. आंबेडकरी,मातंग व बहुजन समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार

 सोनई हादरली जातीय गुन्ह्याने.. आंबेडकरी,मातंग व बहुजन समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत ग...

 सोनई हादरली जातीय गुन्ह्याने.. आंबेडकरी,मातंग व बहुजन समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२४):-सोनई येथे 19 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी, मातंग आणि बहुजन समाजाच्या प्रतिनिधींकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले.सोनई येथील स्वामी विवेकानंद चौकात रात्रीच्या सुमारास मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर काही समाजकंटकांनी अमानुष मारहाण केली.त्यास उचलून नेऊन त्याच्या पायावर चारचाकी वाहन चढविण्यात आले.तसेच लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी निर्दयपणे मारहाण करून एका डोळ्यात चाकू खुपसण्यात आला.


एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्या तरुणाच्या तोंडावर व अंगावर लघुशंका करून अत्यंत घृणास्पद प्रकार केला.या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.निवेदनात आरोपींची नावे संभाजी लोंढे, राजू मोहिते,विशाल वने,दिनेश असणे,संदीप लांडे,स्वप्निल भगत, महेश दरंदले,गणेश चव्हाण, अक्षय शेटे,शुभम मोरे,नितीन शिंदे यांसह २० ते २५ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.निवेदनकर्त्यांनी सांगितले की,या आरोपींना राजकीय आश्रय मिळाल्याने ते खुलेआम फिरत आहेत,तर सत्ताधारी नेते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे या गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी समाजनेत्यांनी केली.या वेळी निवेदन देताना सुरेश बनसोडे,सुमेध गायकवाड, अंकुश मोहिते,अजयराव साळवे, किरण दाभाडे,अमित काळे, किरण गायकवाड,विशाल गायकवाड,सुनील सकट,विनोद दिवटे,सागर ढगे,संजय चांदणे, अजय पाखरे,संतोष शिरसाट, रवींद्र कांबळे,आकाश साबळे, प्रकाश घोरपडे,दिपक सरोदे, येशूदास वाघमारे,याकोब वडागळे आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

No comments