आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे सामाजिक दायित्व..!! एरंडोल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सहवास प्रौढ मतिमंद मुलांच्या विना-अनुदानित न...
आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे सामाजिक दायित्व..!!
एरंडोल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सहवास प्रौढ मतिमंद मुलांच्या विना-अनुदानित निवासी पुनर्वसन संस्थेत दिवाळी निमित्त सर्व विशेष मुलांना फराळ वाटप, बेडशीट-ब्लॅंकेट आणि जीवनावशक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे संचालक श्री जितेंद्र पाटील आणि पदाधिकारी या विशेष सोहळ्याला प्रत्येक्षात उपस्थित राहून सहवास मतिमंद लेकरांना मायेने आणि अतिशय काळजीने असलेला सांभाळ बघू कार्याची प्रशास केली..आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे आभार या वेळेस सहवास संस्थेचे पदाधिकारी यांनी मानले. असेच उपक्रम ग्रामीण भागातील संस्थांना संपन्न झाले तर खऱ्या अर्थाने या विशेष मुलांचे आयुष्य देखील सुसह्य होईल.
सहवास प्रौढ मतिमंद मुलांची संस्था, वनकुटे ता. एरंडोल, जि. जळगाव.
सहवास मतिमंद मुलांसोबत दिवाळी साजरा करताना . आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष : मा.श्री जितेंद्र पाटील यांनी दिवाळी साजरा केली . व तसेच आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे मातोश्री सौ सरोजबाई पाटील , आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन जिल्हा संपर्कप्रमुख : श्री आनंद श्रीराम सूर्यवंशी , सामाजिक कार्यकर्ते श्री विजुभाऊ ठाकूर , सौ दर्शना ठाकूर . श्री मुरली भाऊ, श्री संजय भाऊ भदाणे , संजू भाऊ पाटील ( नागदूली ) साई चौधरी,. ओम चौधरी व महिला सामाजिक कार्यकारणी उपस्थित होते ..


No comments