चोपडा काँग्रेस पक्षाचे शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन पिठल भाकरी खाऊन आंदोलन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 20 ऑ...
चोपडा काँग्रेस पक्षाचे शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन पिठल भाकरी खाऊन आंदोलन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी भार्डू या गावी दुपारी 12:00 वाजता चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अतिशय अंधारात गेली असल्याने शेतीचे पिकांचे व जमिनीचे अतोनात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या पदरी शासनाने फक्त निराशाच टाकली आहे शेतकरी हवालदिल झालेला असून ऐन सणासुदीच्या दिवसात सुध्दा पोटापाण्यासाठी शेतावरच राबत आहे अशा वेळी शेतकऱ्यांना एकटं न सोडता त्यांच्या या बिकट परिस्थितीत काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असून त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीत गोडधोड न खाता पिठलं भाकरी,ठेचा खाऊन आंदोलन करण्यात आले तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांनी स्वतः गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्याशी हितगुज करून पिठलं भाकरी त्यांच्यासोबतच खाऊन काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या व कष्टकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे नमूद केले, भैय्यासाहेबांना शेतकऱ्यांनी व महिला शेतकरी,मजूर यांनी आपल्या बऱ्याच समस्या व सरकार बद्दल असलेला असंतोष,नाराजी व्यक्त केली,
यावेळी चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.सुरेश शामराव पाटील माजी तालुकाध्यक्ष सुरेश सिताराम पाटील,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे ,शेतकी संघाचे व्हा.प्रेसिडेंट बाळकृष्ण शंकरराव सोनवणे,किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे,अल्पसंख्यांक अध्यक्ष आरिफ सिद्दिकी,पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील,रमाकांत सोनवणे,विकास जनकराव पाटील,युवराज उदाजी धनगर,बाळू पाटील ,चेतन बाविस्कर,प्रभाकर पाटील,साहेबराव सोनवणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...


No comments