adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखेर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर — प्रभाग ९, १५, १६ मध्ये मोठे फेरबदल! राजकीय समीकरणात उलथापालथ; “स्थानिक नेत्यांना अनुकूल रचना, नागरिकांवर अन्याय” – गिरीश जाधव

 📰अखेर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर — प्रभाग ९, १५, १६ मध्ये मोठे फेरबदल! राजकीय समीकरणात उलथापालथ; “स्थानिक नेत्यांना अनुकूल रचना, ...

 📰अखेर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर — प्रभाग ९, १५, १६ मध्ये मोठे फेरबदल!

राजकीय समीकरणात उलथापालथ; “स्थानिक नेत्यांना अनुकूल रचना, नागरिकांवर अन्याय” – गिरीश जाधव 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर,(दि.२०) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. ९ ते १३ ऑक्टोबर अशी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची मुदत असतानाही मुदत उलटूनही ती जाहीर होत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. अखेर आज अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होताच शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.या नव्या रचनेत विशेषतः प्रभाग क्रमांक ९, १५ आणि १६ मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक ठिकाणी सीमारेषांमध्ये तोडफोड झाल्याचे दिसून आले. या फेरबदलांमुळे काही नेत्यांना अनुकूल असे प्रभाग तयार करण्यात आल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे.या प्रभागांमध्ये सत्ताधारी गटाशी संबंधित दोन माजी महापौर आणि नगरसेवक आहेत. त्यांच्या राजकीय सोयीसाठीच या रचनेत फेरबदल करण्यात आले असून सामान्य मतदारांवर अन्याय झाला आहे,” असा आरोप जाधव यांनी केला. तसेच आरक्षण जुनेच ठेवून या नव्या रचनेत काहीही पारदर्शकता न ठेवता निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.राजकीय पक्षांच्या आगामी रणनीतींवर या नव्या रचनेचा मोठा परिणाम होणार असून येत्या काही दिवसांत या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये चांगलीच राजकीय चुरस रंगण्याची शक्यता आहे.

No comments