सातारच्या जवानाला पंजाब-चंडीगढ मध्ये वीरमरण, सोमनाथ शामराव सुर्वे यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, सुर्वे कुटुंबावर दुःखाचा डोंगर..!! सं...
सातारच्या जवानाला पंजाब-चंडीगढ मध्ये वीरमरण, सोमनाथ शामराव सुर्वे यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, सुर्वे कुटुंबावर दुःखाचा डोंगर..!!
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यांतील आबईची वाडीच्या जवानाचे पंजाबमधील चंदीगड मध्ये सेवा बजावताना हृदयविकारांच्या झटक्याने निधन झाले आहे. सोमनाथ शामराव सुर्वे (वय 47) असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय मानवंदना देवुन जड:अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जप तक सुरज चांद रहेगा सोमनाथ तेरा नाम रहेगा ! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. जवान सोमनाथ सुर्वे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. तीन महिन्यांपूर्वीच ते रजेवर गावी आले होते. गावातील तरुणांनी सैन्य दलात भरती व्हावे म्हणून नेहमीच ते मार्गदर्शन करायचे अशा आठवणी त्यांचे सहकारी सेवानिवृत्त विजय पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सोमनाथ सुर्वे हे सध्या पंजाब मधील चंदीगड येथे सेवा बजावत होते. सहा महिन्यांपूर्वीच ते सेवानिवृत्त होणार होते. मध्यंतरी आर्मी मध्ये हवालदार पदावर नुकतीच त्यांची बढती झाली होती. पंजाब मधील चंदिगड सैन्य दलाच्या पुरवठा विभागात ते कार्यरत होते. बुधवारी कर्तव्यावर असताना जवान सोमनाथ सुर्वे यांना अचानक हृदयविकारांचा धक्का बसला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती लष्करी विभागाकडूंन आबईचीवाडी ग्रामस्थांना देण्यात आली होती. शुक्रवारी त्यांच्या पार्थिंवावर शासकीय मानवंदना देवुन जड:अंतकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद जवान सोमनाथ यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली,दोन भाऊ बहिणी असा परिवार आहे.

No comments