प्रवीण सपांगे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नेहमीच प्रयत्नशील राहिले संभाजी पुरी...
प्रवीण सपांगे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नेहमीच प्रयत्नशील राहिले
संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे ग्रामीणच्या पोलीस दलात दोन दिवसांपूर्वी आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या आदेशावरून मोठी खांदेपालट करण्यात आली होती. बारामती कामशेत सासवड हवेली वडगांव उरळीकांचन अशा पोलीस ठाणेत नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये नारायणगांव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांचाही समावेश होता त्यांची स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी नारायणगांव पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण सपांगे यांची नियुक्ती करण्यात आली असून. त्यांनी नारायणगांव पोलीस ठाणेत हजर हुन स.पो.नि. महादेव शेलार यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. यावेळी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. स.पो.नि. महादेव शेलार यांच्या बदलीनंतर नारायणगांव पोलीस ठाणेला देखील पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाला आहे. प्रवीण सपांगे यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा बजावली आहे. आता त्यांच्याकडे नारायणगांव पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनीही खाकी वर्दींतील आपलेपणा आणि शांतप्रिय अधिकारी म्हणून देखील त्यांना चांगलेच ओळखले जाते.

No comments