पोदार इंटरनेशनल स्कूल व पोदार प्रेप, अकलूद येथे दिवाळी मेळावा जल्लोषात साजरा. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अकलू...
पोदार इंटरनेशनल स्कूल व पोदार प्रेप, अकलूद येथे दिवाळी मेळावा जल्लोषात साजरा.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अकलूद पोदार इंटरनेशनल स्कूल व पोदार प्रेप मध्ये 17 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सुंदर गीतांनी झाली. ज्यामध्ये मुलांसह पालकांनीही सहभाग घेतला, लहान मुले आणि पालकांनी मोठ्या उत्साहात दिवाळी, सणाचे स्वागत केले व आनंदाचा सुंदर संगम निर्माण केला.
डॉ. स्वाती पोपट वत्स यांच्या अभिनव कल्पनेने , आम्ही दिवाळी हा केवळ आनंदाचा सण न बनवता मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचा आणि शिक्षणाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न केला. यामधे मुलांनी वेगवेगळया क्रियाकलाप केल्या. मुलांनी रंगीबेरंगी कागदापासून सुंदर ओरिगामी दिवे बनवले, विविध आकार वापरून रंगीत रांगोळी तयार केली विविध हेल्दी फूड व हाताने बनविलेल्या कलाकृती वस्तूचे स्टॉल्स लावले व येणाऱ्या दिवाळीपासून जंक फूड न खाता हेल्दी फूड खाण्याचा संदेश सुद्धा देण्यात दिला. शाळेचे प्राचार्य श्री सचिन बनसोडे सर, मुख्याध्यापिका मनिषा शृंगी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकांच्या अथक परिश्रमाने तसेच शिक्षकांनी केलेल्या सुंदर सजावटीने दिवाळी मेळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, थाटामाटात आणि आनंदात पार पडला.


No comments