श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चोपडा तालुका आयोजित गडपुजन सोहळा - २०२५ ॥ श्री दुर्ग चौगाव किल्ला॥ विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत ...
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चोपडा तालुका आयोजित गडपुजन सोहळा - २०२५
॥ श्री दुर्ग चौगाव किल्ला॥
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि. १९ ऑक्टोबर, २०२५ रविवार, रोजी चोपडा तालुका आयोजित चौगावं गावाजवळील श्री दुर्ग चौगाव किल्ला येथे दिवाळीनिमित्त गडपूजन मोहीम राबविण्यात आली होती, या दरम्यान सर्वात अगोदर गडाच्या पायथ्याला असलेल्या त्रिवेणी संगमावर स्थित श्री महादेव मंदिर, मारुती मंदिर येथे सर्व धारकरी व माता भगिनी एकत्रित येऊन प्रेरणा मंत्र घेऊन गडाकडे मार्गक्रमण केले, सुरवातीला गडाच्या पूर्वाभिमुख महाद्वाराला तोरण बांधून द्वाराचे पूजन करण्यात आले, त्या नंतर महाप्रवेश द्वारावरून भंडारा उधळून श्रीशिवछत्रपतींच्या जयघोषात गडात प्रवेश करून उत्तराभिमुख प्रवेशद्वाराला देखील तोरण बांधले, त्या नंतर सर्वात आधी गडावरील मुख्य वाडा बघून सप्त पाण्याचे टाके बघून गडाच्या तटबंदी वरून गडाच्या मुख्य बुरुजावर हिंदवी स्वराज्याचा परम पवित्र भगवा ध्वज चढवून गड निवासिनी आई श्री भवानी मातेच्या मंदिराला तोरण बांधून देवीची आरती करण्यात आली, आरती झाल्यावर गडाची माहिती देण्यात आली आणि मग गड उतरून गडाच्या पायथ्याला त्रिवेणी संगमावर असलेल्या श्री महादेवाच्या, मारुती रायाच्या मंदिरावर चौगाव येथील पांडुरंग पुंडलिक धनगर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.महाप्रसादाचे सेवन करून मोहीमेची सांगता करण्यात आली.
या गडपूजन सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्या बरोबर, धरणगाव तालुका व जळगाव शहरातील धारकरी व माता भगिनी असे तीनशे हून अधिक संख्येने उपस्थित होते.

No comments