एरंडोलचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सह माजी नगरसेवक,सामाजिक पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार व आमदारांच्...
एरंडोलचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सह माजी नगरसेवक,सामाजिक पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश,
माजी आमदार व आमदारांच्या हस्ते सत्कार.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल येथील माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे,माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र
पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोशन मराठे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अमोल पाटील यांनी डॉ. नरेंद्र पाटील, छाया दाभाडे यांच्यासह पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे
स्वागत केले.आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकत्यांचा मेळावा पारोळा येथे आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार चिमणराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे, माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, रोशन मराठे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपतालुकाप्रमुख संजय पाटील, निपाणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. माजी
नगराध्यक्षा जयश्री पाटील, उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. पालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, तालुका प्रमुख रवींद्र जाधव, शहर प्रमुख बबलू चौधरी, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.मनोज पाटील, तालुकाप्रमुख कमलेश पाटील,माजी तालुका प्रमुख बबलू पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन, प्रभाकर (दादाजी) पाटील, माजी
उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, गबाजी पाटील, रुपेश माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एरंडोल पालिकेवर सुमारे पंचवीस वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. शहरात पक्षाचे संघटन मजबूत असले तरी प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे पक्षात दोन गट पडल्याने कार्यकत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हे मतभेद मिटवण्याऐवजी एका
गटाला पाठिंबा देऊन दुसऱ्या गटाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याने अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे.नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.दरम्यान जसजशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळजवळ येत असताना अजून कुठल्या घडामोडी घडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सध्या शहरात मात्र भाजपाच्या गटबाजीमुळे शिवसेना शिंदे गटाला फायदा होत असून त्यांची स्थिती भक्कम होत असल्याचे चित्र दिसत आहे.

No comments