काटा गावातील बंद असलेली घंटा गाडी तात्काळ सुरू करण्याची मागणी — आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमकडून निवेदन काटा (ता. वाशिम) प्रतिनिधी – (संपाद...
काटा गावातील बंद असलेली घंटा गाडी तात्काळ सुरू करण्याची मागणी — आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमकडून निवेदन
काटा (ता. वाशिम) प्रतिनिधी –
(संपादक हेमकांत गायकवाड)
काटा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील घंटा गाडी (कचरा संकलन वाहन) गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने तालुका अध्यक्ष अमोल माधव मोरे यांनी काटा ग्रामपंचायतीकडे तात्काळ घंटा गाडी सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले. गावातील घंटा गाडी बंद असल्यामुळे गावात स्वच्छतेचा अभाव निर्माण झाला असून, नागरिकांना अस्वच्छता व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन फोरमने ग्रामपंचायतीला तात्काळ आवश्यक ती कारवाई करून घंटा गाडी सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गाव स्वच्छ व आरोग्यदायी राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम वाशिम तालुका अध्यक्ष अमोल माधव मोरे यांच्या स्वाक्षरी आहे.

No comments