adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संत मुक्ताई पत्रकार संघटना, मुक्ताईनगर – नवी कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अमोल वैद्य तर सचिव पदी राजेश पाटील

 संत मुक्ताई पत्रकार संघटना, मुक्ताईनगर – नवी कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अमोल वैद्य तर सचिव पदी राजेश पाटील  मुक्ताईनगर (ता. प्रतिनिधी): (...

 संत मुक्ताई पत्रकार संघटना, मुक्ताईनगर – नवी कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अमोल वैद्य तर सचिव पदी राजेश पाटील 


मुक्ताईनगर (ता. प्रतिनिधी):

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

संत मुक्ताई पत्रकार संघटना, मुक्ताईनगर यांची नवी कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी अमोल वैद्य, उपाध्यक्षपदी मुकेश महल्ले, तर सचिवपदी राजेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत असे ठरविण्यात आले की, मागील कार्यकारिणी ही संस्थेतील इतर सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत होती. त्यामुळे संस्थेतील सदस्यांनी एकत्र येत त्या कार्यकारिणीविरोधात अविश्वास ठराव मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी गठीत करताना संघटनेतील सदस्यांनी एकत्रित निर्णय घेत नवी नेतृत्व व्यवस्था निश्चित केली. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:- अध्यक्ष: अमोल वैद्य, उपाध्यक्ष: मुकेश महल्ले, सचिव: राजेश पाटील, कार्याध्यक्ष एम के पाटील सर, कोषाध्यक्ष राजेश चौधरी, ज्येष्ठ सल्लागार मोहन मेढे, संतोष मराठे, मतीन शेख, संघटक दीपक चौधरी, रवींद्र धनगर, सदस्य  प्रवीण भोई, देवेंद्र काटे, छबीलास पाटील, निलेश मेढे ही कार्यकारिणी भविष्यात संघटनेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवून पत्रकारांच्या हितासाठी काम करेल, असा विश्वास नव्या नेतृत्वाने व्यक्त केला

No comments