जळगाव माध्यमिक पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव...
जळगाव माध्यमिक पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी जळगाव या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीसाठी संस्थेच्या धर्मदाय निधीतून ११ लाख रुपयांचा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराजी पाटील यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे, मा आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संस्थेचे मार्गदर्शक मा.अध्यक्ष एस्.डी.भिरुड यांच्या सेवा पूर्ती गौरव सोहळा प्रसंगी देण्यात आला . यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सोनम पाटील, मानद सचिव भगतसिंग पाटील, उपाध्यक्ष वैशाली महाजन, खजिनदार संजय निकम, संचालक भावेश अहीरराव, जे.पी.सपकाळे, हेमंत चौधरी, तुषार बोरसे, सिध्देश्वर वाघुळदे, शैलेश राणे,आबा पाटील, डी.एस्.पाटील, रविंद्र रणदिवे, अजय पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते. सदर धनादेश आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाम गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कडे सुपूर्त केला.

No comments