adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक करा. नाही तर आंदोलन पेटेल!सकल आंबेडकरी समाजाचा इशारा

 महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक करा. नाही तर आंदोलन पेटेल!सकल आंबेडकरी समाजाचा इशारा.  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- ‌हेमकांत गायकवाड...

 महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक करा. नाही तर आंदोलन पेटेल!सकल आंबेडकरी समाजाचा इशारा. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- ‌हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.७):-अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारात शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आल्याने वातावरण अधिक चिघळले आहे.या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. “महापुरुषांचा अपमान करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.संघटनांनी पोलिस प्रशासनाला उड्डाणपुल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या घटनेतून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.दरम्यान,देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भात घडलेल्या निंदनीय प्रकाराचाही निषेध या निवेदनात करण्यात आला आहे. दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आंबेडकरी समाजाने केली आहे.या वेळी सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, अजय साळवे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, अतुल भिंगारदिवे, सागर ठोकळ, सिद्धार्थ आढाव, सुहास पाटोळे, सचिन शेलार, प्रा. विलास साठे, संदेश लांडगे, अंकुश मोहिते, सुनील शेत्रे, भीमराव पगारे, पप्पू शिंदे, प्रमोद वडागळे, सतीश शिरसाठ, योगेश थोरात, अमित काळे, अतुल ढेपे, समीर भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे, विशाल गायकवाड, सुभाष वाघमारे, राहुल शिवशरण, अजय पाखरे आदी उपस्थित होते.

No comments