adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर ते मोरखेड बस सेवा तात्काळ सुरू करा- सौ.कोमलताई तायडे यांची मागणी

 मलकापूर ते मोरखेड बस सेवा तात्काळ सुरू करा- सौ.कोमलताई तायडे यांची मागणी  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : मलका...

 मलकापूर ते मोरखेड बस सेवा तात्काळ सुरू करा- सौ.कोमलताई तायडे यांची मागणी 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : मलकापूर, दुधलगाव बु., शिराढोण मार्गे मोरखेड बु. बससेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी आगार व्यवस्थापक मलकापूर यांना जनक्रांती फाऊंडेशनच्या अध्यक्षा इंजि.सौ.कोमलताई तायडे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे आज २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मोरखेड बु. व शिराढोण येथील दुधलगांव बु. व मलकापूर येथे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना ये-जा करणे करिता खाजगी वाहनांचा उपयोग करावा लागतो. सदर खाजगी वाहने ही वेळेवर उपलब्ध होत नाहीत व ते आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्यामुळे वेळेसह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी हे शेतकरी कुटूंबातील असल्यामुळे त्यांचेवर आर्थिक भार पडत आहे. तसेच त्यांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून बस सेवा ही सुरक्षीत असल्यामुळे त्यांना शाळेत ये-जा करणेसाठी मलकापूर आगार मधुन दुधलगांव बु-शिराढोण मार्गे- मोरखेड बु. बस सेवा सुरू केल्यास त्याचा शैक्षणिक प्रवास अनुकूल होवून शेतकरी कुटूंबांना आर्थिक जाचातून मुक्तता मिळेल.

आपल्या विभागाकडून सदर अडचणीची दखल घेवून संबंधीत मार्गावर मलकापूर येथून सोमवार ते शुक्रवार बसची वेळ सकाळी ९ वा. व संध्याकाळी ५ वा. बसेस उपलब्ध करून द्याव्यात तसेच शनिवारला सकाळी ६.३० वा. व ११ वा. बसेस उपलब्ध करून दयाव्या अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर इंजि.सौ. कोमलताई सचिन तायडे यांचेसह प्रविण पाटील, सोपान रामा सोळंके, उमेश रमेश सोनवणे, राजेंद्र भास्कर नाफडे, गजेंद्र नाफडे, नितेश तांगडे, आधारसिंग चव्हाण, नवल पाटील यांचेसह अनेक नागरीक व महिला उपस्थित होत्या.

No comments