सासवड पोलीस ठाणेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची पुरीगोसावी सातारकरांनी घेतली सदीच्छा भेट (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. (संपादक -...
सासवड पोलीस ठाणेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची पुरीगोसावी सातारकरांनी घेतली सदीच्छा भेट
(पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे ग्रामीण विभागातील सासवड पोलीस ठाणेचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी आदरणीय कुमार कदम साहेबांची संभाजी पुरीगोसावी यांनी जयहिंद नमस्कार साहेब असे म्हणत पोलीस ठाण्यात सदिंच्छा भेट घेतली. यावेळी पोलीस निरीक्षकांशी विविध विषयावर मनमोकळा संवाद साधला. पोलीस निरीक्षक कुमार कदम हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून महाराष्ट्र पोलीस प्रशासनात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी पुणे ग्रामीण विभागातील विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली. सासवड पोलीस ठाणेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या बदलीनंतर पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या आदेशावरून नव्याने सासवड पोलीस ठाण्यात नुकतीच नियुक्ती झाली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी पदभार घेताच सासवडकरांना आव्हान केले होते. कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल असे म्हणत त्यांनी पोलीस ठाण्यात एन्ट्री केली होती.

No comments