adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू करून आर्थिक स्थैर्य द्या! शेतकऱ्यांसह कामगारांची मागणी

  मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू करून आर्थिक स्थैर्य द्या! शेतकऱ्यांसह कामगारांची मागणी  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फै...

 मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू करून आर्थिक स्थैर्य द्या!

शेतकऱ्यांसह कामगारांची मागणी 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील बंद पडलेला मधुकर सहकारी साखर कारखाना हा शेतकरी कामगार व स्थानिक व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता अनेक वर्षापासून बँक कर्जाच्या ओझ्यामुळे बंद पडलेला हा मधुकर सहकारी साखर कारखाना मे इंडिया बायो अँड ऍग्रो स्पेसिफिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतला आहे कंपनीचा हेतू कारखाना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना उसाचा हमी बाजार मिळावा आणि कामगारांच्या हातात पुन्हा रोजगार मिळावा हाच आहे शेतकरी कामगारांच्या अपेक्षा असूनही कारखाना सुरू होण्यात अद्यापही अडथळे कायम आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक थांबले आहे ऊस पिक हे पारंपरिकरित्या रब्बी पीक म्हणून ओळखले जाते यंदाच्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत परंतु ऊस हे असे पीक आहे की जे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीतही तुलनेने टिकून राहते याची दीर्घकाल टिकवण्याची क्षमता असल्याने ते शेतकऱ्यांना सुरक्षिततेचा आधार देत असते ऊस पिकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला कायमचं चांगला बाजार भाव मिळत असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला ऊस हे पीक स्थैर्य प्रदान करते अडचणीच्या काळात शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ऊस पिकातून करू शकतो म्हणूनच उसकी केवळ शेतीचा आधार नाही तर शेतकऱ्यांचा विश्वास आणि भविष्याचा आधारस्तंभ मानले जाते ऊस हे पीक कोणत्याही हवामानात तग धरते मात्र कारखाना सुरू नसल्याने शेतकरी ऊस लागवड करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक संकट कोसळले आहे यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा स्थितीत कारखाने सुरू झाले तर शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव मिळण्यास मदत होईल आणि कामगारांनाही रोजगाराची हमी मिळेल कामगारांचे चित्र आणखी भयावह आहे कारखाना बंद असल्याने हजारो कुटुंबे बेरोजगारीच्या विळख्यात अडकली आहेत मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे घरात उपासमारीची वेळ येत आहे छोट्या दुकानदारापासून ते ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांपर्यंत संपूर्ण गावाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे गावकऱ्यांचे एकच मागणी आहे मधुकर सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू व्हावा ! मे इंडिया बायो अँड ऍग्रो स्पेसिफिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नेतृत्वाखाली कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांना उसाचा योग्य भाव मिळेल कामगारांच्या हाताला रोजगार मिळेल आणि गाव पुन्हा विकासाच्या मार्गावर जाईल या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार व लहान मोठे व्यवसायिक नागरिक यांचे म्हणणे आहे की पालकमंत्री आमदार खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही या विषयात पुढाकार घेऊन कारखाने सुरू व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे कारण शेतकरी आणि कामगार यांच्या भवितव्याशी हा प्रश्न थेट जोडलेला आहे मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे हेच आमचं जीवन आहे हीच आमची उपजीविका आहे तोच आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे असे शेतकरी कामगार व स्थानिक व्यापारी तसेच कारखान्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे म्हणणे आहे कारखाना नियमितपणे सुरू राहिला पाहिजे ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल.

No comments