यावल महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन व सेवा पंधरवडा समारोप भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक ...
यावल महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन व सेवा पंधरवडा समारोप
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दिनांक २ ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. व यानंतर महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 स्वच्छता अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजामध्ये स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण व्हावी.आपला आजूबाजूचा परिसर,आपले शहर,देश स्वच्छ व सुंदर व्हावा, असा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी यावल शहरात स्वच्छता हीच सेवा याविषयी रॅली काढण्यात आली.व स्वच्छता पंधरवडा चे समारोप करण्यात आला. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सी.टी.वसावे व रासेयोचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

No comments