निमखेड येथे दरवर्षी प्रमाणे महर्षी वाल्मिकी जयंती टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गाय...
निमखेड येथे दरवर्षी प्रमाणे महर्षी वाल्मिकी जयंती टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर तालुक्यातील निमखेड येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा टाळ मृदुंगाच्या गजरात महिला भगिनी नागरिक व लहान मुले यांनी टाळ वीणा वाजवून व पावले खेळून आनंद व्यक्त केला . नवयुवक महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती यांनी सुद्धा खूप परिश्रम घेऊन पूर्ण गावाला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जयंतीनिमित्त भेट देण्यासाठी धाडस सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भाऊ खवले व तालुका अध्यक्ष कृष्णा दोडे यांनी महर्षी वाल्मिकीच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर भाऊ खवले यांना रुमाल टोपी व श्रीफळ देऊन सत्कार केला. निमखेड येथील टाळकरी भजनी मंडळ यांनी मोठ्या उत्साहात दिंडी काढली. गावातील महिला यांनी महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिमेचे पूजन केले व गावातील जेष्ठ कार्यकर्ते यांनी पूर्ण सहकार्य केले


No comments