🚨 अहिल्यानगर हादरलं..! शाळकरी मुलीचा बस चालकाकडून विनयभंग.. विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपाद...
🚨 अहिल्यानगर हादरलं..! शाळकरी मुलीचा बस चालकाकडून विनयभंग.. विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१५):-शहरात पुन्हा एकदा विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शाळेतून घरी जात असताना दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेच्या बसचालकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शहरात प्रचंड खळबळ माजली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नामांकित शाळेतील १५ वर्षीय विद्यार्थिनी बुधवारी (दि. १५ ऑक्टोबर) दुपारी पेपर संपवून शाळेच्या बसने घरी परतत असताना बसचालकाने तिच्याशी अश्लील वर्तन केले.मुलीने धैर्य दाखवत ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली.त्यानंतर पालकांनी तत्काळ तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.आरोपी बसचालकाचे नाव बाळू दादा वेरकर असे सांगितले जात असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, शहरातील शाळांमधील सुरक्षेच्या व्यवस्था पुरेशा आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

No comments