तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांचे चोपडा येथे उद्घाटन, तहसीलदार व पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मैदानी स्पर्धांचे उद्घाटन चोपडा प्रतिन...
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांचे चोपडा येथे उद्घाटन, तहसीलदार व पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मैदानी स्पर्धांचे उद्घाटन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुकास्तरीय वैयक्तिक 14 वर्षे वय आतील विद्यार्थ्यांसाठी मैदानी स्पर्धांचे आयोजन दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. सदर स्पर्धांचे उद्घाटन येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या हस्ते भाला थाळी आणि गोळा यांचे पूजन करून करण्यात आले. थाळी व गोळा यांचे पूजन करून व नारळ वाढवून महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय समोरील ट्रॅक वर उद्घाटन करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एन. एस. सोनवणे, तालुका क्रीडा समन्वयक रवींद्र आल्हाट, स्वाती चौधरी, जगदीश जाधव, क्रीडा शिक्षक देविदास महाजन, तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळुंखे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते. तहसीलदार भाऊसाहेब थोरात हे स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू असल्याने त्यांनी उपस्थित सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अकुलखेडा येथे रास्ता रोको असल्यामुळे त्यांना तात्काळ त्या ठिकाणी जावे लागले. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी जीवनात खेळाशिवाय महत्व नाही, खेळामुळेच व्यक्तिमत्व बहरत असते व खेळामुळेच व्यक्तीला संयम प्राप्त होत असतो
आणि संयमाने जग जिंकता येते, त्यामुळे जीवनात खेळ आणि व्यायाम अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगत सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या मनोगतातून खेळाचे महत्त्व पटवून दिले. 100 , 200, 400 ,600 , 800 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, थाळीफेक आदी स्पर्धा या मैदानावर संपन्न झाल्या. क्रीडा शिक्षक स्वाती चौधरी , सुरेश शंकर चौधरी, नरेंद्र महाजन, अमोल पाटील, अशोक शंभू पावरा, अशोक साळुंखे, जितेंद्र महाजन, जगदीश बाविस्कर, प्रशांत गुरव, जगदीश जाधव,श्री वळवी,आदी शारीरिक शिक्षकांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक साळुंखे यांनी तर आभार नरेंद्र महाजन यांनी व्यक्त केले. तर प्रास्ताविक तालुका क्रीडा समन्वयक राजेंद्र आल्हाट यांनी तर मुख्याध्यापक श्री एन. एस. सोनवणे यांनी शाळा व संस्थेचा लेखा जोखा मांडला. पाहुण्यांचा परिचय संजय सोनवणे यांनी केला.
No comments