रिंगणगाव येथे २ लाख ८७ हजारांची चोरी. एरंडोल प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे बंद घराच्या दरवाज्...
रिंगणगाव येथे २ लाख ८७ हजारांची चोरी.
एरंडोल प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे बंद घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांचे रोख रकमेसह दागिने लंपास केल्याची घटना घडली असून सुमारे २ लाख ८७ हजार रुपये किमतीची चोरी केली आहे.
याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनवरून मिळालेली माहिती अशी की रिंगणगाव येथील प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय पंढरीनाथ महाजन व त्यांच्या पत्नी दोघं दि.१३ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या मुलाकडे धरणगाव येथे गेले होते.त्यादरम्यान त्यांचे घर बंद होते.त्यांना दुसऱ्यादिवशी पोलिस पाटील वासुदेव मोरे हे त्यांच्या घरा शेजारीच राहत होते.त्यांनी फोनवर तुमच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे सांगितले.त्यावेळी दत्तात्रय महाजन,त्यांची पत्नी व मुलगा हे लागलीच रिंगणगाव येथे आले असता त्यांना आपल्या घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट अस्ताव्यस्य करुन
त्यांच्या घरातून ३ ग्रॅम वजनाची अंगठी सुमारे ७ हजार रुपये, २ तोळ्याचा सोन्याचा तुकडा सुमारे ९० हजार रुपये,५ ग्रॅम कानातील टोंगल सुमारे १० हजार रुपये,२० भार चांदीचे दागिने सुमारे २० हजार रुपये आणि रोकड रक्कम रु.१ लाख ६० हजार रुपये असा एकूण २लाख ८७ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.तसेच त्यांच्या समोर राहणारे ज्ञानेश्वर चौधरी हे सुद्धा बाहेर गावी गेलेले त्यांच्या घरच्या दरवाज्याचे कुलूप तोडलेले होते परंतु ते बाहेर गावी असल्याने काय चोरीस गेले हे मात्र कळू शकले नाही.पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश पाटील व कॉ.अमोल भोसले एरंडोल पोलीस करीत आहे.गावात चोरी झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
No comments