यावल महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील जळगाव ज...
यावल महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे महविद्याल्याच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली इंग्रजी विभागाद्वारे निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.
महाविद्यालयात दिनांक 03/10/2025 रोजी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे होते . 1) द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटल हेल्थ ऑफ स्टुडन्ट लाईफ 2) एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी 3) फ्युचर ऑफ डेमोक्रेसी इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी 4) आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रेट ऑर ऑपॉर्च्युनिटी 5) जेंडर इक्वलिटी मीथ ऑर रियालिटी?
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कृष्णा विनोद पाटील (एफवायबीएससी) द्वितीय क्रमांक धनश्री मनोज सोनवणे (एसवायबीकॉम) तृतीय क्रमांक संघशीला संदीप भालेराव (एफवायबीए) यांनी मिळवला. स्पर्धेचे मूल्यमापन प्रा.नागेश्वर जगताप प्रा.मृणाल धायडे यांनी केले. उपप्राचार्य एम.डी खैरनार उपप्राचार्य डॉ.एच. जी. भंगाळे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.भागवत पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा.अर्जुन गाडे प्रा.पंकज पाटील प्रा.प्रशांत मोरे प्रा. रामेश्वर निंबाळकर यांनी यशस्वीरीत्या स्पर्धा पार पडली.

No comments