तीन पिढ्यांची श्रद्धेची परंपरा : पुण्यातील फिलादेल्फिया ख्रिस्त मंडळी चर्चमध्ये अखंड देवआराधना आणि समाजसेवा सचिन मोकळं पुणे प्रतिनिधी (संप...
तीन पिढ्यांची श्रद्धेची परंपरा : पुण्यातील फिलादेल्फिया ख्रिस्त मंडळी चर्चमध्ये अखंड देवआराधना आणि समाजसेवा
सचिन मोकळं पुणे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे (दि.६):- पुणे शहरातील हडपसर येथे स्थित फिलादेल्फिया ख्रिस्त मंडळी चर्च गेली वीस वर्षांहून अधिक काळ जिवंत देवाची आराधना आणि समाजसेवेचे कार्य मनोभावे करत आहे.या चर्चचे प्रमुख पाद्री रेव्ह. दीपक दुसाने यांच्या नेतृत्वाखाली या मंडळीने श्रद्धा, प्रेम आणि सेवाभावाच्या माध्यमातून पुणे शहरासह ग्रामीण भागातही एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.या चर्चचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे तीन पिढ्या एकत्र येऊन देवाची आराधना करताना दिसतात. आजी-आजोबा, त्यांची मुले आणि नातवंडे अशा तीन पिढ्यांचा भक्तीमय सहभाग हे या चर्चचे प्रेरणादायी वैशिष्ट्य ठरले आहे.
या भक्तिपरिवारातील सर्वात लहान सदस्य ज्योशवा सिरसाट (वय ५ वर्षे) असून,सर्वात ज्येष्ठ सदस्य पा.सावकार सकट (वय ५० वर्षे) आहेत. या दोघांच्या उपस्थितीत तीन पिढ्यांची भक्तिभावपूर्ण संगम साधताना पाहणे ही एक अनोखी आणि प्रेरणादायी अनुभूती असते. रेव्ह. दीपक दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या मंडळीच्या प्रार्थनासभांमध्ये रविवारी तसेच विशेष प्रसंगी शेकडो भक्त उत्साहाने सहभागी होतात. वयस्कर, तरुण आणि बालक सर्वांच्या सहभागामुळे चर्च परिसर सतत भक्तीभावाने उजळलेला असतो. रेव्ह. दुसाने यांनी सांगितले की, “देवावरील श्रद्धा, कुटुंबातील एकता आणि समाजसेवेचा भाव — ही आमच्या चर्चची खरी ओळख आहे. तीन पिढ्या एकत्र येऊन देवाची आराधना करतात हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ही परंपरा पुढेही अविरत सुरू राहील. ”या चर्चमार्फत समाजोपयोगी कार्यांनाही मोठे प्राधान्य दिले जाते.गरीब व गरजूंना मदत, रुग्णांसाठी प्रार्थना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, तसेच विविध सामाजिक उपक्रम या मंडळीमार्फत नियमितपणे राबवले जातात. हडपसरमधील फिलादेल्फिया ख्रिस्त मंडळी चर्च हे केवळ उपासनेचे ठिकाण नसून श्रद्धा,एकता आणि सेवेचा सजीव संदेश देणारे केंद्र ठरले आहे. तीन पिढ्यांची ही अखंड आराधना आज पुणेकरांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनली आहे.

No comments