पत्रकार सागर शेलार यांचा सन २०२५ चा विशेष सन्मान पुरस्काराने गौरव...! कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कासोदा ता...
पत्रकार सागर शेलार यांचा सन २०२५ चा विशेष सन्मान पुरस्काराने गौरव...!
कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कासोदा ता.एरंडोल :- येथील युवा पत्रकार खान्देश संपर्क प्रमुख - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सागर शेलार यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रातून समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल व संघटना वाढीसाठी गेल्या सात वर्षापासून केलेल्या कामाची दखल घेत त्यांना सन २०२५ विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अधिवेशनात हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भडगाव - पाचोरा मतदारसंघांचे आमदार किशोर आप्पा पाटील , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सागर शेलार यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारतांना सागर शेलार यांनी सांगितले की " हा पुरस्कार माझा व्यक्तिगत कार्याचा नसून त्यामागे मला भक्कम असा पाठिंबा देणारे माझे कुटुंब , सर्व सहकारी मित्र यांच्या सहकार्याचा आहे. पत्रकारिता क्षेत्रातून मी नेहमी समाज हित व अन्यायाला न्याय देण्यासाठी माझ्या लिखाणातून प्रयत्न करीन व समाज हित व माझ्या पत्रकार संघाच्या वाढीसाठी काम करत राहील. यावेळी संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्या बद्दल शेलार यांच्यावर राजकीय सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments