जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत थेपडे विद्यालयाने पटकाविला तिसरा क्रमांक जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमकां...
जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत थेपडे विद्यालयाने पटकाविला तिसरा क्रमांक
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या मार्फत दरवर्षी होणाऱ्या जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता जि जळगाव या विद्यालयाला ग्रामीण भागात जिल्हास्तरीय *तृतीय क्रमांक* मिळाला. गांधी जयंती निमित्त होणारी गीत गायन स्पर्धा ही 30/9/2025 झाली होती. शहरी व ग्रामीण असे दोन विभाग स्पर्धेसाठी होते त्यात जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांनी सहभाग घेतला होता. लयबद्ध स्वर, सुरांची व संगीताची उत्तम साथ घेऊन इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी हे उज्वल यश प्राप्त केले. हा पुरस्कार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद सर यांनी प्रदान केला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन श्री एस सी बाविस्कर सर व सहकारी श्री डी एम सोनवणे सर यांनी केले होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री पी डी चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. उपप्राचार्य श्री जी डी बच्छाव सर तसेच पर्यवेक्षक के पी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले होते. संस्थेचे चेअरमन माननीय श्री के पी थेपडे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक तसेच सर्व शालेय परिवाराचे अभिनंदन केले. पुरस्कार सोहळा जळगाव येथील गांधी उद्यानात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री पी डी चौधरी सर उपाप्रचार्य श्री. जी डी बच्छाव व पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर शिक्षक प्रतिनिधी श्री सचिन चव्हाण सर ज्येष्ठ शिक्षक श्री एस एम नेतकर सर, मार्गदर्शक शिक्षक श्री एस सी बाविस्कर सर, श्री. एन. के अहिरे, श्रीमती ए डी नेवे मॅडम, श्री टी वाय मगरे, सर श्री पी ए महाजन सर, श्री पी ए बाविस्कर सर, श्रीमती पी पी चव्हाण मॅडम, श्रीमती कविता पाटील मॅडम, श्रीमती संगीता पाटील मॅडम, श्रीमती भावना चौधरी मॅडम, श्रीमती दीपिका पाटील मॅडम, श्रीमती के बी पाटील मॅडम, श्री अमोल चौधरी सर, श्री निलेश पवार सर, श्रीमती योगिता पाटील मॅडम, श्री अरविंद पाटील सर, श्री पी पी मगरे सर, श्री वाय एन शिंदे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री पवन मोरे सर राहुल कोळी हे उपस्थित होते.

No comments