तालुकास्तरीय धावणे स्पर्धेत आदर्श विद्यालयाचा विजयाचा झेंडा धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव येथील आदर्श विद्यालयाच्य...
तालुकास्तरीय धावणे स्पर्धेत आदर्श विद्यालयाचा विजयाचा झेंडा
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव येथील आदर्श विद्यालयाच्या इयत्ता ९ वीतील विद्यार्थिनी गौरवी गजानन माळी व रिया दिपक देसले यांनी तालुकास्तरीय ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत चमकदार यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे त्या दोघींची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धरणगाव येथे पार पडली. विद्यार्थिनींना मार्गदर्शन क्रीडाशिक्षक फिलिप गावीत यांनी केले असून, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष सी.के. पाटील, सचिव सुरेखा पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील व अश्विन पाटील यांनीही यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

No comments