वाचनामुळे वाचकाला नवीन दृष्टिकोन मिळतो - सतीश चौधरी इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वाचन म्हणजे केवळ अक्षराचे ओळखणे न...
वाचनामुळे वाचकाला नवीन दृष्टिकोन मिळतो - सतीश चौधरी
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाचन म्हणजे केवळ अक्षराचे ओळखणे नव्हे तर ते एक शक्तिशाली माध्यम आहे. ज्याच्याद्वारे आपण नवीन ज्ञान प्राप्त करू शकतो.आपल्या कल्पनाशक्तीला आकार देऊ शकतो आणि स्वतःला विकसित करू शकतो. वाचनामुळे आपल्याला विविध अनुभवांचा लाभ घेता येतो. नवीन दृष्टिकोन मिळतो आणि आपल्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यात वाढ होते. वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. म्हणूनच आपल्याला वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे आणि इतरांनाही वाचनासाठी प्रेरित केले पाहिजे असे प्रतिपादन चिनावलच्या नूतन माध्यमिक विद्यालयातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सतीश चौधरी यांनी श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे पुस्तक प्रदर्शना प्रसंगी काढले. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनानिमित्त उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. वाचनालयाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन हेमकांत गाजरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, उपसरपंच चेतन इंगळे, गिरीश चोपडे सर, यावल तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक प्रवीण वारके उपस्थित होते. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस सतीश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.उद्घाटक सतीश चौधरी सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा वाचनालयातर्फे चेअरमन हेमकांत गाजरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भारत विद्यालयाचे सेवानिवृत्त कला शिक्षक आर बी चौधरी, खेमचंद्र इंगळे, लीलाधर तळेले, ईश्वर इंगळे, प्रदीप तळेले, मधुकर तळेले, डिगंबर इंगळे, सचिव युवराज तळेले, संचालक गंगाराम वाघुळदे, दिव्य झोपे, ग्रंथपाल ललित इंगळे, सहग्रंथपाल सौ.कविता इंगळे ,भास्कर भोगे व वाचक उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना, सूत्रसंचालन व आभार संचालक ललित कुमार फिरके यांनी केले.
No comments