सराईत सोनसाखळी चोर जेरबंद — १.८० लाखांचा सोन्याचा मुद्देमाल व मोटारसायकल जप्त! तोफखाना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी सचिन मोकळं अहिल्यानगर (...
सराईत सोनसाखळी चोर जेरबंद — १.८० लाखांचा सोन्याचा मुद्देमाल व मोटारसायकल जप्त! तोफखाना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१५):-तोफखाना पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सराईत सोनसाखळी चोराला जेरबंद करत १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.पोलिसांच्या या शिताफीच्या तपासामुळे शहरातील महिलांच्या दागिन्यांवर डोळा ठेवणाऱ्या गुन्हेगारांना चपराक बसली आहे.दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी सौ.लिलाबाई गोरख सायकड (वय ६६ वर्षे,रा.आसरा सोसायटी, गुलमोहर रोड, अहिल्यानगर) या सकाळच्या व्यायामानंतर एकविरा चौक ते पारिजात चौक मार्गे सिद्धेश्वर कॉलनी येथे घरी जात असताना, दोन अनोळखी इसम मोपेड मोटारसायकलवर आले.त्यापैकी एकाने फिर्यादींच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसका मारून तोडले आणि दोघेही मोटारसायकलवरून पसार झाले.या घटनेनंतर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ९६८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी हाती घेतला.गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना, हा गुन्हा सराईत सोनसाखळी चोर किरण उर्फ कुबड्या दशरथ पालवे (वय २५, रा.नागापूर,ता. व जि.अहिल्यानगर) याने केल्याचे निष्पन्न झाले.त्यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली व सांगितले की त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार महेश बाबासाहेब आरु (रा. नागापूर) याच्यासोबत केला होता.चौकशीत आरोपींकडून १२ ग्रॅम वजनाचे १,२०,००० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ६०,००० रुपयांची मोपेड मोटारसायकल असा एकूण १,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
⚖️ आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी :
मुख्य आरोपी किरण उर्फ कुबड्या दशरथ पालवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी एम.आय.डी.सी.कोतवाली (अहिल्यानगर) तसेच गेवराई (बीड) पोलीस स्टेशन येथे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खूनाचा प्रयत्न (कलम ३०७), चोरी (कलम ३७९), मारहाण (कलम ३२३), दरोडा, अवैध हत्यार व मद्यप्रकरणे यांचा समावेश आहे.
👮♂️ कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबरमे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पो.उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ.सुनील चव्हाण, नितीन उगलमुगले,भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, अब्दुल इनामदार, सुरज वाबळे, सुधीर खाडे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे,भगवत बांगर, सुजय हिवाळे, दादासाहेब रोहकले, सर्व नेमणूक तोफखाना पोलीस स्टेशन तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी विशेष मेहनत घेतली. तोफखाना पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा पोलिसांचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी या जलद आणि अचूक तपासाचे कौतुक केले आहे.
No comments