मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची दमदार कामगिरी, एक कोटी रुपये किंमतीच्या बनावट नोटा हस्तगत..!! संभाजी पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रत...
मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची दमदार कामगिरी, एक कोटी रुपये किंमतीच्या बनावट नोटा हस्तगत..!!
संभाजी पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सांगली एक कोटी रुपये किंमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांच्या पथकांने ही मोठी कारवाई कारवाई केली आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्यांचा यात सहभाग उघड झाल्याने या प्रकरणाची चर्चा होताना दिसून येत आहे. हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी पारितोषिक देखील जाहीर केले होते. पश्चिम महाराष्ट्रांतील कंपन्यांसह एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनी नोटांवर एवढी मोठी आणि पहिलीच कारवाई आहे. झेरॉक्स मशीन बनावट नोटा मोजण्याचे मशीन स्कॅनर प्रिंट जप्त करण्यात आला आहे. आरोपीं कडून 500 ते 200 रुपयांच्या नोटा देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा महात्मा गांधी चौकीचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक रूपाली गायकवाड पूनम पाटील पो. कॉ. सचिन कुंभार अभिजीत पाटील सर्जेराव पवार राहुल शिरसागर नानासाहेब चंदनशिवे बसवराज कुंदगोळ राजेंद्र हारगे अमोल तोडकर विनोद चव्हाण आदीं पोलिसांनी या कारवाई सहभागी घेतला तसेच सायबर पोलीस ठाणेकडील रूपाली बोबडे अभिजीत पाटील अजय पाटील या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून पथकांचे अभिनंदन करीत विशेष कौतुक केले

No comments