मनवेल येथे युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकेला निरोप विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैसातून आणले भेटवस्तू भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...
मनवेल येथे युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकेला निरोप
विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैसातून आणले भेटवस्तू
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील मनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कु. वर्षा वसंत पाटील यांचा निरोप समारंभ व सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षिका वर्षा वसंत पाटील यांना निरोप देतांना शालेय मुलांना अश्रूअनावर झाले. आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांनी मुलांना नवनवीन अभ्यासक्रमाद्वारे विविध उपक्रम व खेळ शिकवत आपलेसे केले होते. या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज पाटील होते. यावेळी व्यवस्थापन समितीचे सदस्य पन्नालाल पाटील, विजय पाटील, विशाल पाटील, गोकुळ कोळी, सिमा कोळी उपस्थित होते .
वर्षा पाटील यांनी आपल्या मनोगतात ही शाळा कायम माझ्या स्मरणात राहील व सर्वांनी मला उत्तम सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन उपशिक्षक प्रविण पाटील यांनी केले प्रास्तविक दिपक चव्हाण यांनी केले तर आभार मुख्यध्यापक सौ संगीता पाटील यांनी मानले

No comments