धनाजी नाना महाविद्यालयात तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -...
धनाजी नाना महाविद्यालयात तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने आज दि.११ ऑक्टोबर २०२५ रोजी तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी भूषविले, तर दे.ना.भोळे महाविद्यालय, भुसावळ येथील प्रा. डॉ. दयाघन राणे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. या वेळी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील, सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास वाघुळदे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सविता कलवले तसेच एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी एनएसएस स्वयंसेवकांना तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे आवाहन केले. “आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तंबाखूच्या व्यसनापासून दूर करण्याचा संकल्प करा,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्वेता भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कीर्ती महाजन, श्वेता भालेराव, अश्विनी पवार, प्रेरणा भालेराव, दीक्षा वानखेडे तसेच एनएसएसच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. तंबाखूविरोधी जनजागृतीबरोबरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाने विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना जागृत झाली.

No comments