मोठी बातमी:- गौतमी पाटील हिला उचलायचे की नाही? चंद्रकांत पाटलांचा थेट डीसीपींना फोन नृत्यांगनाच्या अडचणीत मोठी वाढ..!! शितल मुंडे ( पुणे...
मोठी बातमी:- गौतमी पाटील हिला उचलायचे की नाही? चंद्रकांत पाटलांचा थेट डीसीपींना फोन नृत्यांगनाच्या अडचणीत मोठी वाढ..!!
शितल मुंडे ( पुणे शहर ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सबसे कातील नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय अपघात प्रकरण चांगलेच अंगलट आल्याचे दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात डीसीपींना फोन केलाय, ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. पुण्यात गौतमी पाटलांच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र गौतमी पाटलांच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षाचालक कुटुंबीय कारवाईची मागणी करीत आहे नृत्यांगना गौतमी पाटील ला अटक करण्याचे मागणी केली जात आहे. या सोबतच ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर काही वेळ ठिय्या आंदोलन केले अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची कुटुंबीयांनी पोलिसांकडे मागणी केली आहे हेच नाहीतर रिक्षा चालकांच्या मुलीने गंभीर आरोप करीत म्हटले की सीसीटीव्ही फुटेज आम्हांला दिली जात नाही तोपर्यंत गाडीमधून उतरण्याचा चेहरा दाखवला जात नाही. रिक्षा चालकांची मुलगी थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचली यानंतर चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन लावला ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसतोय, यामध्ये थेट गौतमी पाटील ला उचलायचे की नाही? असा थेट सवालही केला आहे. चंद्रकांत पाटील आणि डीसीपी यांच्यात झालेला संवाद तुम्ही तुम्ही म्हणाला गौतमी पाटील गाडीत नव्हती पण कोणीतरी गाडी चालवत होतं ना, भूत गाडी चालवत होतं का. जो कोणी गाडी चालवत होता त्याला पकडावे लागेल ना, केस दाखल केली आहे ती गाडी कुठे आहे ती गाडी जप्त करून टाका आणि गाडीच्या मालकीण गौतमी पाटील ला नोटीस द्या.

No comments