करंजी घाट लुटीचा उलगडा.. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; 7.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत ग...
करंजी घाट लुटीचा उलगडा.. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; 7.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२९):-करंजी घाट परिसरात वाहने अडवून प्रवाशांची लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून तब्बल ₹7,90,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एक आरोपी फरार आहे.घटनेची हकीगत अशी की, फिर्यादी शिवाजी बाळासाहेब पाटेकर (वय 32, रा. ढोरजळगाव, ता. पाथर्डी) हे दि.16 ऑक्टोबर रोजी पहाटे कारने प्रवास करत असताना करंजी घाटात काळ्या रंगाच्या कारमधील आरोपींनी त्यांची कार अडवून गळ्यातील सोन्याची चैन आणि चालकाकडील ₹9,500/- रोख रक्कम असा एकूण ₹74,500/- रुपयांचा मुद्देमाल लुटला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 1172/2025, भा.दं.सं. 2023 चे कलम 309(4), 324(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हरीश भोये यांच्या पथकाने तपास सुरू केला. पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी संकेत चिंधु पडवळ (रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) आणि नामदेव बाळासाहेब भोकसे (रा. कुरकुंडी, ता. खेड) यांना कडूस फाटा, खेड येथे सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी जगदीश सुरेश शिवेकर (रा. करंजविहिरे, ता. खेड — फरार) याच्यासह लुटीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हुंदाई व्हेरना कार (किंमत ₹7,00,000/-) व दोन मोबाईल फोन (किंमत ₹90,000/-) असा एकूण ₹7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. हरीश भोये, तसेच पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, सुरेश माळी, दीपक घाटकर, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, मनोज साखेर व भगवान धुळे यांनी केली आहे.पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

No comments