मा. उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय, निलंगा यांना क्रांतीवीर लहूजी शक्तीच्या वतीने निवेदन सादर निलंगा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
मा. उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय, निलंगा यांना क्रांतीवीर लहूजी शक्तीच्या वतीने निवेदन सादर
निलंगा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मा. उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय, निलंगा यांना क्रांतीवीर लहूजी शक्तीच्या वतीने निवेदन सादर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नेवासा तालुक्यातील सोनई गावात मातंग समाजातील युवक संजय वैरागर यास अपहराण करून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर लघुशंका करुन थुंकण्यात आले हि बाब अतिशय निंदनीय असून आरोपीवर योग्य ती कडक कार्यवाही करणे याबाबत नुकतेच
उपरोक्त विषयी विनंतीपुर्वक निवेदन करण्यात येते की, नेवासा तालुक्यातील सोनई गावात मातंग समाजातील युवक संजय वैरागर यास गावातील काही मनुवादी, जातीयवादी, लोकांनी अपहरण करून बेदम मारहाण केलेली आहे. व त्यांच्यावर लघुशंका करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेले आहे. अशा जातीयवादी मनुवादी आरोपींविरुद्ध योग्य कडक कार्यवाही करून समस्त मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा
तरी मा. साहेबांना नम्र विनंती की, वरील आरोपीविरुध्द योग्यती कडक कार्यवाही करून पिडीतांच्या कुटूंबास व समस्त मातंग समाजाला न्याय मिळवून दयावा अन्यथा सखल मातंग समाजाच्या वतीने व क्रांतीवीर लहूजी शक्तीच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे दिलेल्या निवेदनावर समस्त समाज बांधवांच्या व कार्यकर्त्यांच्या सह्या केल्या आहेत

No comments