adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फलटण डॉक्टर मृत्यू : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला बेड्या; PSI गोपाळ बदने फरारच

 खाकिला काळिमा विश्वास करायचं तरी कुणावर,रक्षकच निघाला वैरी  पोलीस प्रशासनाच्या विश्वासाला तडा जनसामान्यातून सर्वत्र नाराजीचा सूर! फलटण डॉक्...

 खाकिला काळिमा विश्वास करायचं तरी कुणावर,रक्षकच निघाला वैरी 

पोलीस प्रशासनाच्या विश्वासाला तडा जनसामान्यातून सर्वत्र नाराजीचा सूर!

फलटण डॉक्टर मृत्यू  : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला बेड्या; PSI गोपाळ बदने फरारच


सातारा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (फलटण हॉस्पिटल) महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Satara Doctor Suicide) केली होती. यावेळी तिने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने, प्रशांत बनकर यांच्यासह एका खासदारांच्या पीएवर गंभीर आरोप केले होते. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यानंतर आता याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) हा फलटणमधील निंबोरे या गावात मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला होता. यावेळी पोलिसांनी (Police) त्याला पहाटे पाच वाजेच्या सुमारास सापळा रचून अटक केली. तर प्रमुख संशयित आरोपी असलेला पीएसआय गोपाल बदने मात्र अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी सातारा पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आलेली आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. यानंतर आज प्रशांत बनकर या संशयिताला (Suspected) बेड्या ठोकल्या. महिला डॉक्टराने आत्महत्या करण्याआधी पीएसआय गोपाल बदने याने वारंवार आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच फलटणमधील विद्यानगर येथे राहत असणाऱ्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानेही चार महिने मानसिक छळ केल्याचे महिला डॉक्टराने आत्महत्या केलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.


No comments