🌟 महाराष्ट्रातील उत्कृष्ट टॉप RTI पुरस्काराने दीपक पाचपुते सन्मानित 🌟 पुण्यातील अधिवेशनात पुणे मनपा उपआयुक्त नितीन केंजळे सर यांच्या हस्...
🌟 महाराष्ट्रातील उत्कृष्ट टॉप RTI पुरस्काराने दीपक पाचपुते सन्मानित 🌟
पुण्यातील अधिवेशनात पुणे मनपा उपआयुक्त नितीन केंजळे सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
पुणे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे : या वर्षीचा महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट टॉप RTI (माहिती अधिकार) पुरस्कार अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यात झालेल्या माहिती अधिकार नागरिक समूहाच्या तिसऱ्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात, पुणे महानगरपालिका उपआयुक्त नितीन केंजळे सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
दीपक पाचपुते यांनी माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून शासनातील पारदर्शकता वाढविणे, नागरिकांचे हक्क जपणे, आणि जनजागृती करणे या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे माहिती अधिकार चळवळीला ग्रामीण भागात नवी दिशा मिळाली आहे.
या कार्यक्रमास मंगलदास सर, प्रकाश सर आणि विलास सर आदी मान्यवर उपस्थित होते. पाचपुते यांच्या या सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान वाढला असून, कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments